कॉफी आणि आयुष्य 
 माजी विद्यार्थी त्यांच्या जुन्या विद्यापीठाच्या प्राध्यापकांना भेटण्यासाठी एकत्र आले . त्यांच्या संभाषणाचे रूपांतर त्यांची काम आणि त्यामुळे येणारे ताण तणाव यात झाले

प्राध्यापक स्वयंपाकघरात गेले आणि एका मोठ्या जगमध्ये कॉफी आणि सर्वांसाठी कप घेऊन ते परतले- पोर्सिलीन, प्लास्टिक, काच, क्रिस्टल, काही साधे , काही महाग, काही विलक्षण - असे वेगवेगळे कप होते , तुम्हाला जो हवा तो कप घ्या असे प्राध्यपक म्हणाले

जेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी कपात कॉफी घेतली तेव्हा प्रोफेसर म्हणाले: "आपण लक्षात घेतले तर, सर्वानी  छान दिसणारे महाग कपडे उचलले आहेत, जे साध्या आणि स्वस्त कप ठेवून दिले आहेत . स्वतःसाठी सर्वोत्तम गोष्टीची निवड करणे हि सामान्य बाब आहे पण हीच गोष्ट  तुमच्या  समस्येचे आणि तणावांचे स्त्रोत आहे.

खरेतर कपामुळे कॉफिच्या चवीत किंवा गुणवत्तेत कोणताच फरक पडत नाही तरीही आपण सर्वोत्तमकपाचीच निवड केलीत त्यांनंतरही दुसऱ्याचा कप किती चांगला आहे याकडे तुमचं लक्ष गेलं

आता लाखात घ्या आयुष्य म्हणजे कॉफि आहे ,आणि कप म्हणजे तुमचं काम , नोकरी किंवा समाजातील तुमचं स्थान कप फक्त कॉफी पिण्यासाठीच माध्यम आहे त्यामुळे तुमच्या आयुश्याच्या चवीत काहीच फरक पडत नाही .
 कधी कधी आपण कपावर एवढं लक्ष देतो कि आपलं कॉफिचा आनंद घेण्यास विसरून जातो .

आनंद माणसाकडे सर्वकाही नसते पण जे असते त्यात तो समाधानी असतो

Comments

Popular posts from this blog