पैसे बचतीचे ७ सोपे मार्ग
१. तुमच्या खर्चाची नोंद करा .
जसे एक लहानसे छिद्र हि बोट बुडवू शकते त्या प्रमाणे लहान लहान खर्चामुळॆ तुमचा आर्थिक डोलारा कोसळू शकतो . रोज होणारा लहातणतला लहान खर्च लिहून ठेवा , त्याची योग्य श्रेणी ठरवा
बिल , ATM पावती जपून ठेवा ,. अँप द्वारे पैसे दिल्यास त्याची नोंद ठेवा
2. बजेट तयार करा
तुम्हाला एकदा याची कल्पना आली कि कुठे किती खरंच येतो आहे मग त्यानुसार तुमचं महिन्याचं बजेट ठरवा . बजेटमुळे तुमच्या खर्चाला ताळेबंद बसू शकेल . आपली मिळकत आणि आपला खर्च याचा हिशोब ठेवा
३. बचत योजना तयार करा
आता तुम्ही बजेट बनवलेत, आता त्यात बचतीसाठी एक श्रेणी बनवा , आपल्या मिळकतीची १० ते १५ % रक्कम बचत म्हणून ठेवा . जर तुमचे खर्च जास्त आणि बचत कमी तर तुम्हाला याकडे गंभीरपणे बघण्याची गरज आहे .
४. बचतीसाठी ध्येय
बचतीसाठी एखादे ध्येय ठराव , कसासाठी तुम्ही बचत करत आहेत लग्न , घर किंवा कार असा प्रकारे ध्येय ठरवून तुम्ही बचत करू शकता . किती व कशी बचत करायची आहे यासाठी आर्थिक सल्लागारचा सल्ला घ्या .अल्पकालीन बचत ध्येय ( १ ते ३ महिने ) - आपत्कालीन बचत , मोठी सुट्टी किंवा कारसाठी डाऊन पेमेंट इतर
दीर्घकालीन बचत ध्येय ( ४ + वर्ष )
घरासाठी डाऊन पेमेंट
मुलांचे शिक्षण
निवृत्ती
५ . अग्रक्रम ठरवा
बचत व खर्च ठरवल्यानंतर अग्रक्रम ठरवा कोणती गोष्टीची गरज आहे. उदा .कार घेण्याची किंवा इतर कोणत्या गोष्टीची खरंच गरज आहे का ? ह्यासाठी खर्चाचा अग्रक्रम ठरवा कोणते खरंच नजीकच्या काळात किंवा गरजेचे आहेत याची योग्य नोंद घ्या
६. योग्य गुंतवणूक
- बचत खाते
- RD किंवा FD गुंतणवूक
- म्युचुअल फंड असे गुंतवणूकीचे योग्य मार्ग तुम्ही आर्थिक सल्लागाराच्या सल्ल्याने निवडू शकता
७. पुनरावलोकन
दर महिन्याला तुमच्या बजेट , खर्च आणि गुंतवणुकीचे पुनरावलोकन करा . यामुळे तुम्ही तुमच्या वयक्तिक बचत योजने बरोबरच खर्च तुमच्या आर्थिक समस्या लवकर ओळखून त्यावर उपाय करू शकाल हे सोपे मार्ग आहेत तुम्हाला प्रत्येक महिन्याला पैश्याचे नियोजन करायला प्रेरित करतील
Comments
Post a Comment